गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील संत गजानन महाराज पॉलीटेक्निकला नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिएशन (एन.बी.ए.) कडून झालेल्या पुनर्मुल्यांकनात कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग या चार विभागांना मूल्यांकन प्रक्रियेत पुन्हा एकदा मानांकन प्राप्त झाले आहे.
कॉलेजला यापुर्वी २०२० मध्ये पहिल्यांदा एन.बी.ए.चा मानांकन प्राप्त झाले होते. मानांकनानुसार गुणवत्ता निर्धारित करण्यासाठी दर तीन वर्षांनी पुनर्मुल्यांकन करण्यात येते त्यानुसार एप्रिल 2023 मध्ये एनबीएचे तज्ञ समितीने कॉलेजचे मूल्यांकनासाठी तपासणी केली होती याचा नुकताच निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये चार विभागाने मानांकन प्राप्त करीत यश मिळवला आहे. अशाप्रकारच्या मानांकित कॉलेजमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी असते.
याकामी प्राचार्य प्रा. डी.बी.केस्ती, उपप्राचार्या रोहिणी पाटील, प्रा.अब्दुल मुल्ला यांच्यासह सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले. तर संस्थाध्यक्ष ॲड. डॉ. आण्णासाहेब चव्हाण, डॉ.यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, ॲड. बाळासाहेब चव्हाण यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले.
विद्यार्थी हिताच्या उपक्रमांची दखल : ॲड. अण्णासाहेब चव्हाण
पॉलिटेक्निकच्या सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे पुनर्मुल्यांकन मिळाला आहे. संस्थेने विद्यार्थी हितासाठी राबवलेले विविध उपक्रमाचे दखल एनबीए ने घेतला आहे असे ॲड. डॉ. आण्णासाहेब चव्हाण यांनी सांगितले.
आजपर्यंतच्या कॉलेजच्या प्रगतीची घेतली नोंद : प्राचार्य डी. बी. केस्ती
प्रामुख्याने संत गजानन महाराज पॉलिटेक्निक कॉलेजने शैक्षणिक उद्दिष्टे, दर्जा व त्यांची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांचे गुणवत्ता, रोजगार, पायाभूत सुविधा तसेच यापूर्वी मिळालेल्या मानांकन ते आजपर्यंत कॉलेजने साधलेले प्रगतीची नोंद घेऊन हे पुनर्मुल्यांकन मिळाला आहे असे प्राचार्य डी. बी. केस्ती म्हणाले.




