हलकर्णी भाग हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
शाळेला १.५० लाखाचे पाणी शुद्धीकरण यंत्रणा भेट
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी भाग हायस्कूल हलकर्णी (ता गडहिंग्लज) च्या सन १९८६-८७ या शैक्षणिक वर्षातील एस.एस.सी. विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा स्नेहमेळावा शाळेमध्ये संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी एस. एस. पाटील होते. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला दीड लाख रुपये खर्चून जलशुद्धीकरण यंत्रणा भेट म्हणून देत शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमात माजी शिक्षक व्ही. टी. जोलापुरे, के. आर. शेडगे, ए. डी.देसाई, एस. एम. रामाजगोळ, एस. एस. पाटील, के. बी. चौगले, ए. एम.चौगुले, एम. आर. संकपाळ, आर. एस मठपती, एस.एस. आसवले. व्ही. एन. गरुड, इब्राहीम मकानदार, अशोक चिकबसर्गे, विद्यमान मुख्याध्यापक आर. एस. पाटील यांचा तसेच शाळेतील विद्यमान शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
![]() |
| हलकर्णी : स्नेह मेळाव्यास उपस्थित माजी विद्यार्थी. |
विद्यार्थ्यांनी शाळेच्या व शिक्षकाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमामुळे आज आम्ही जीवनात यशस्वी झाल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या बॅचचे विद्यार्थी व सध्या पुणे येथील उद्योजक उदय चौगुले, माध्यमिक शिक्षक आनंद व्हसकोटी, इस्माईल कादरभाई, शिवशंकर हत्तरकी, बाळासाहेब रत्नापगोळ, महादेव पाथरवट, दस्तगीर मकानदार, हेमा धबाले, कल्पना निर्वाणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी १.५० लाख रुपये किमतीची पाणी शुद्धीकरण यंत्रणा भेट म्हणून शाळेला दिली. यावेळी माजी शिक्षकांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. या भेटीबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय शहा व मुख्याध्यापक आर. एस. पाटील यांनी आभार व्यक्त केले. शिवशंकर हत्तरकी व उदय चौगुले यांनी अध्यक्ष व शिक्षकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी सपना भेंडीगिरी यांनी केले तर आभार राजकुमार हिरेमठ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या वर्गातील हलकर्णी, कुंबळहाळ, चंदनकुड, इदरगुची, कडलगे, नंदनवाड या गावातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



