गडहिंग्लज (प्रतिनिधी): युवा सेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अवधूत पाटील यांनी गडहिंग्लज तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी केलेल्या कामाची दखल घेत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांनी अवधूत आनंदराव पाटील यांची कोल्हापूर जिल्हा युवा सेना प्रमुखपदी निवड केली आहे.
यासाठी युवा सेना विभागीय सचिव अविनाश बलकवडे, युवा सेना विस्तारक डॉ. सतीश नरसिंग, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांचे सहकार्य लाभले. निवडीचे पत्र देतेवेळी युवा सेना समन्वयक प्रतीक क्षीरसागर, शिवसेना गडहिंग्लज शहरप्रमुख संतोष चिकोडे, उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी, संदीप कुराडे हे उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या निवडीही करण्यात आल्या.

