उपमुख्यमंत्री पदी डी के शिवकुमार
कर्नाटकात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न
आठ आमदारांनीही घेतली मंत्री पदाची शपथ
बेळगाव जिल्ह्यातून आमदार सतीश जारकीहोळी यांनी घेतली मंत्री पदाची शपथ
बेंगळुरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या दुसऱ्यांदा विराजमान झाले. उपमुख्यमंत्री पदी डी.के. शिवकुमार यांची नियुक्ती करण्यात आली. शनिवारी कर्नाटकच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी आठ आमदारांनीही मंत्री पदाची शपथ घेतली. बेळगाव जिल्ह्यातून आमदार सतीश जारकीहोळी यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे.
यावेळी जी परमेश्वर, के एच मुनियाप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, सतीश जारकीहोळी, प्रियांका खर्गे, रामलिंगा रेड्डी, बी झेड जमीर अहमद खान आदींनी मंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.


