नौकुड येथे 'जल जीवन मिशन'अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नौकुड गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. गावात कोणतीही समस्या, प्रश्न असोत आपणास केव्हाही ग्रामस्थांनी सांगावे त्याची सोडवणूक केली जाईल अशी ग्वाही चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी दिली.
नौकुड येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ६० लाख ९१ हजार रुपये खर्चून कार्यान्वित करण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार राजेश पाटील बोलत होते. यावेळी या योजनेचा शुभारंभ नूलच्या सुरगीश्वर मठाचे मठाधिपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
प्रारंभी स्वागत व प्रस्ताविक नौकुडचे सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी केले. यावेळी त्यांनी गावातील अंतर्गत रस्ते, गर्टस, व्यायाम शाळा, मुबलक पाणीपुरवठा यासह विविध प्रश्न आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी नेताजी मांगले, चंद्रकांत दरेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रामाप्पा करिगार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभय देसाई, पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक जयसिंग चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक, डॉ. गंगाधर व्हसकोटी, माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार मुन्नोळी, जिल्हा मजूर संघाचे संचालक दिपक पुजारी, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, गटविकास अधिकारी शरद मगर, गौरव कांबळे, महाबळेश्वर चौगुले, के. टी.शेलार, नरेवाडी सरपंच अकुंश रणदिवे, सरपंच दिपाली कांबळे, अशोक पाटील, प्रसाद जोशी, सोमनाथ घेज्जी, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुशांत नौकुडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बसवराज पुजारी यांच्यासह नौकुडचे सरपंच शुक्राचार्य चोथे,
उपसरपंच रेखा सरदेसाई, सदस्य हिराबाई चौगुले, सुरेखा गुरव, देवस्थान कमिटी अध्यक्ष सुनील शेलार, तंटामुक्त समिती अध्यक्ष भाऊसाहेब लोहार, नौकुड ग्रामस्थ मंडळ मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांत दरेकर, विवेकानंद नार्वेकर, माजी उपसरपंच सुधाकर चव्हाण, भिमराव गोडसे, सचिन गोडसे, बाळासाहेब पाटील, संजय डवरी, श्रीकांत गुरव, संभाजी चौगुले, बाबुराव गोईलकर, भरत कदम, रामा गोईलकर, बाबुराव बिरंजे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शुक्राचार्य चव्हाण, जोतिबा मांगले, शिवाजी गुरव, बाबुराव बिरंजे, संजय बिरंजे, अनिल शेलार, सैनिक चव्हाण, शितल मांगले, कविता खैरे, रोहिणी मांगले, शांता नाईक, कविता चव्हाण, रेखा डवरी, संगीता लोहार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
सुत्रसंचालन सचिन गोडसे यांनी केले. आभार जयवंत बिरंजे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन ग्रामसेवक विजय जाधव, विनोद चोथे, रमेश पाटील, शंकर कांबळे, पक्षाचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांनी केले.







