Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणीत आजी-माजी सैनिक संघटनेला हॉल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या

आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनची ग्रामपंचायतीकडे मागणी


सरपंच करवीर उथळे यांना निवेदन सादर  



तेरणी : सरपंच करवीर उथळे यांना निवेदन देताना आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी. यावेळी उपस्थित ग्रामसेवक निवृत्ती कोंडुस्कर, किरण चौगुले.     



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तेरणी ग्रामपंचायत हद्दीतील बसस्थानका नजीक हॉल बांधण्यासाठी पाचशे चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने ग्रामपंचायतीकडे निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन  सरपंच करवीर उथळे यांना देण्यात आले आहे. यावेळी नौदलातील सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी सुरेश लांडे, ग्रामसेवक निवृत्ती कोंडुस्कर, किरण चौगुले उपस्थित होते.



या निवेदनात म्हटले आहे की,  तेरणी गावातील आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनमध्ये८० आजी- माजी सैनिक सभासद आहेत.  या संघटनेची रीतसर नोंदणी देखील करण्यात आली आहे. सभासदांच्या कल्याणकारी योजना राबविणे त्याचबरोबर युवा वर्गाला देश सेवेसाठी मार्गदर्शन करून त्यांना तयार करणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी हॉल बांधण्यामागे आहे. त्याचबरोबर विविध क्लासेस, वाचनालय, करिअर गायडन्स, सरकारी योजनांचे मार्गदर्शन आदी समाज उपयोगी कामे करण्यासाठी सदर जागेची नितांत गरज आहे.



तेरणी बसस्थानकाजवळील दक्षिणेकडील व विठ्ठल मंदिराच्या उत्तरेकडील ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा सद्यस्थितीत मोकळी आहे. त्यातील अंदाजे 500 चौरस फूट जागा आजी-माजी सैनिक संघटनेला हॉल बांधण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावी. अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.



निवेदन देतेवेळी नौदलातील सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी सुरेश लांडे,  माजी सैनिक सदाशिव तोडकर, सदाशिव खणदाळे, सलीम जमादार, मारुती नावलगी, करवीर मांगले यांच्यासह आजी- माजी सैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.