Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हसुरचंपूत शिवसेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): हसुरचंपू शिवसेना शाखेच्या वतीने कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 200 नागरिकांची तपासणी करण्यात आली.





प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी सरपंच श्रीमती प्रभावती बागी, शाखाप्रमुख मारुती कमते, संभाजी येरुडकर, चंद्रशेखर खवणे, आनंदा  गोंधळी, शकील मुल्ला, बिराप्पा हुक्केरी, भैरू बिरंजे, सुरेश शेंडगे, सचिन शेंडगे, शिवाजीराव काकडे यांच्यासह ग्रामस्थ, इतर मान्यवर उपस्थित होते.






मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 


दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ 200 ग्रामस्थांनी घेतला. अर्जुन रिफायनरी व देशपांडे काजू कारखाना येथील कामगारांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.