वाहतूक नियंत्रक एम.आर. सरदेसाई, मेकॅनिकल रामभाऊ पाटील, राजेंद्र सुतार, चालक एम. एस.कांबळे, टी.आर.राणे, वाहक श्रीकांत गुरव सेवानिवृत्त
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज आगारात सेवानिवृत्ती निमित्त कर्मचाऱ्यांचा सत्कार आगार व्यवस्थापक जी.एन.रणे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्ती बद्दल वाहतूक नियंत्रक एम.आर. सरदेसाई, मेकॅनिकल रामभाऊ पाटील, राजेंद्र सुतार, चालक एम. एस.कांबळे, टी.आर.राणे, वाहक श्रीकांत गुरव यांचा कुटुंबियांसह सत्कार करण्यात आला. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्यात आले. आगाराच्यावतीने शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सहाय्यक वाहतूक निरीक्षक एस एन व्यवहारे, श्री.सोनवणे, श्री.पोवार, कार्यशाळा अधीक्षक आर.डी. फगरे, अकाउंटंट अनिल पाटील, वरिष्ठ लिपिक अजित अकोळकर, कर्मचारी प्रतिनिधी अमोल तांबेकर, पी. टी.सुर्यवंशी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.



