(छायाचित्र: मज्जिद किल्लेदार)
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था संचलित शिवराज इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, ए.बी.पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
नर्सरी ते पहिलीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे औक्षण करून वर्गात प्रवेश देण्यात आला. नर्सरीच्या विद्यार्थ्यांचे शाळेत पहिलेच पाऊल असल्याने त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सदर उपक्रम मुख्याध्यापिका सौ गौरी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. स्वागत सौ. दीपा आंबोलकर यांनी केले. आभार शरद कांबळे यांनी मानले.





