Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणातील 'त्या' दोघांना विजापूरमधून ताब्यात

गडहिंग्लज पोलिसांची ३६ तासाच्या आत कारवाई 


या प्रकरणातील आणखी दोघांचा शोध सुरु 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): उद्योजक संतोष शिंदे, त्यांची पत्नी व मुलाच्या आत्महत्या प्रकरणी गडहिंग्लजच्या 'त्या' माजी नगरसेविकेसह पोलीस अधिकारी या दोघांना गडहिंग्लज पोलिसांनी काल रात्री कर्नाटकातील विजापूर येथून ताब्यात घेतले आहे. ३६ तासाच्या आतच या दोघांना ताब्यात घेण्यात गडहिंग्लज पोलिसांना यश आले आहे.  या प्रकरणातील अन्य  दोघांचा शोधही सुरू असून पोलीस पथके त्या दिशेने रवाना करण्यात आली आहेत. 



युवा उद्योजक संतोष शिंदे यांनी माजी नगरसेविका व तिचा साथीदार पोलीस अधिकारी या दोघांच्या खंडणीच्या त्रासाला कंटाळून तसेच आणखी दोघांनी घेतलेले साडेसहा कोटी रुपये परत न केल्याने या तणावातून शुक्रवारी रात्री पत्नी मुलासह राहत्या घरी गळा चिरून घेत आत्महत्या केली होती. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. मृतदेहा शेजारी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये हे चौघे आपल्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचे उद्योजक संतोष शिंदे व पत्नी तेजस्विनी यांनी लिहून ठेवले होते. या प्रकरणी शुभम बाबर यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांनी या चौघांवरही गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके नियुक्त करून विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. दरम्यान, यातील माजी नगरसेविका व पोलीस अधिकारी या दोघांना कर्नाटकातील विजापूर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.