गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी कोल्हापूर जिल्हा विस्तारक डॉ.सतीश नरसिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी त्यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन पक्ष संघटना वाढ, युवकांचे प्रश्न, शैक्षणिक समस्या, रोजगार, सोशल मीडियाचा प्रभावी वापर तसेच इतर समाजोपयोगी नवनवीन उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले.
बैठकीस युवासेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख अवधूत पाटील, कागल जिल्हा समन्वयक जयसिंग टिकले, राधानगरी जिल्हा समन्वयक सागर भावके, चंदगड जिल्हा चिटणीस कृष्णा पाटील, चंदगड उपजिल्हा प्रमुख महेश पाटील, राधानगरी उपजिल्हा प्रमुख प्रसाद पिल्लारे, कागल उपजिल्हाप्रमुख समीर देसाई, कागल उपजिल्हा समन्वयक सुरेश पाटील, गडहिंग्लज तालुकाप्रमुख सागर हेब्बाळे, कागल तालुका प्रमुख राजकिरण सावडकर, चंदगड तालुका प्रमुख विक्रम मुतकेकर, आजरा तालुका प्रमुख रोहित डावरे, आजरा तालुका प्रमुख राजकुमार भोगण, कागल तालुका समन्वयक अवधूत पाटील, सोशल मीडिया आजरा समन्वयक शकील मुल्ला, सोशल मीडिया कागल समन्वयक सतीश माणगावकर, गडहिंग्लज उपशहर प्रमुख सुमित कोरवी, विभाग प्रमुख तेजस घेवडे, शिवसैनिक सुरेश पाटील, युवा सैनिक अरुण भारमल, अवधूत सातवेकर, रोहन गिरी, रोहन तिप्पे, राकेश पाटील, प्रथमेश खोत यांच्यासह युवासैनिक उपस्थित होते.




