Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हसुरचंपू शिवसेना शाखेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

मोफत नेत्र तपासणी शिबिरात १०० रुग्णांची तपासणी




गडहिंग्लज (प्रतिनिधी): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती हसुरचंपू शिवसेना शाखेच्या वतीने साजरी करण्यात आली. दरम्यान, यानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. शिबिरात १०० रुग्णांची तपासणी करण्यात आली.



प्रतिमेचे पूजन प्रा.भोईटे, रमेश मसुरे,  मारुती वळकी, सदानंद नांगणुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख मारुती कमते, संघटक संभाजी येरुडकर, चंद्रशेखर खवणे, आनंदा गोंधळी, गावातील ग्रामस्थ सिद्धाप्पा मुसाई, रामा कोचरगे, हालाप्पा कुरणे, रामा कोचरगे,  ग्रामस्थ, शिवसैनिक उपस्थित होते. प्रा.भोईटे यांनी शाहू महाराजांबद्दल मनोगत व्यक्त केले. शिवसेनेचे शाखाप्रमुख मारुती कमते यांनी आभार मानले.



नेत्र तपासणी शिबिरात १०० रुग्णांची तपासणी 


राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त लायन्स आय हॉस्पिटल व शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये १०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. ४० मोतीबिंदूचे विकार असलेले रुग्ण आढळले. त्यांच्या मोफत शस्त्रक्रियासाठी पाठपुरावा करण्यात आला. डोळ्याची तपासणी करून चष्मा क्रमांक देण्यात आला.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.