Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नौकुडचे सरपंच शुक्राचार्य चोथे व समाजसेवक डॉ. गंगाधर व्हसकोटी यांचा वाढदिवस साजरा


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
नौकुडचे सरपंच शुक्राचार्य चोथे व समाजसेवक डॉ. गंगाधर व्हसकोटी यांचा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हलकर्णी येथे साजरा करण्यात आला.

          


यावेळी माजी जि. प. सदस्य जयकुमार मुन्नोळी यांनी आपल्या मनोगतातून नौकुडचे सरपंच शुक्राचार्य चोथे यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. सरपंच चोथे यांच्यामुळे नौकुड गावचा  सर्वांगीण विकास होत असल्याचे सांगितले. जयसिंग चव्हाण म्हणाले, नौकुड सरपंच चोथे यांचे कार्य हे उल्लेखनीय आहे. त्यांनी नौकुड गावचा कायापालट केल्याचे कौतुक उद्गार त्यांनी काढले. माजी सभापती अमर चव्हाण म्हणाले,  सरपंच शुक्राचार्य चोथे यांच्यामुळे नौकुड गावचे नाव हे कोल्हापूर जिल्ह्यात  पोहचले आहे. विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी गावचा चेहरा मोहरा बदलला आहे.

        


सत्कारबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सरपंच शुक्राचार्य चोथे म्हणाले,  नौकुड गावामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये आमदार राजेश पाटील यांच्या फंडातून विविध विकास कामांसाठी 35 लाख रुपये निधी मिळालेला आहे.  तसेच गावामध्ये शिक्षण, आरोग्य,पाणी, रस्ते, वीज यासह  मंदिर परिसरात सुशोभीकरण केले आहे. यापुढील काळात देखील गावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.



यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रामाप्पा करिगार, पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण, माजी जि.प. सदस्य जयकुमार मुन्नोळी, जयसिंग चव्हाण यांच्यासह हलकर्णी जिल्हा परिषद मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.