गडहिंग्लज (प्रतिनिधी): मनवाड येथील कु. शुभांगी सुधाकर पाटील हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानप्रकाश रेडेकर होते.
यावेळी शुभांगीला भरजरीफेटा, शाल, श्रीफळ व बुके देवून मुंबई पोलीस तथा माजी सैनिक यल्लापा रेडेकर यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायतीमार्फत सरपंच ज्ञानप्रकाश रेडेकर, उपसरपंच वैभवी लोखंडे, पांडूरंग लोखंडे, ग्रामसेवक विजय जाधव, कमल कांबळे व सर्व सदस्य यांनी शुभांगीचा सत्कार केला.
त्यानंतर मनसे अध्यक्ष दिपक लोखंडे यानी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. शाळेतर्फे अध्यक्ष राजेंद्र रेडेकर, सुधीर पाटील, मुख्याध्यापक श्री. हुली, सौ आनंदी रेडेकर, सौ. दिपा पाटील, सौ. अनपूर्णा रेडेकर सर्व शिक्षक यांनी सत्कार केला.
शुभांगीच्या सत्कार सोहळ्यानंतर शाळेतून पदोन्नती प्राप्त झालेले श्री. हुली व श्री. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. श्री.हुली यांचा सत्कार दुंडाप्पा पाटील व श्री. पाटील यांचा सत्कार पांडूरंग लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
गावातील माध्यमिक शिक्षक रावसाहेब पाटील यांनी शुभांगीच्या या यशाबद्दल तिचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामस्थांनी आपल्या मुलांसाठी काय केले पाहिजे ? काय नको केले पाहिजे ? संस्कार कशा पद्धतीने करावे ? पालकांनी आपल्या पाल्याशी कसे वागावे ? याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. श्री. आरदाळकर यानी स्पर्धेच्या युगात पालकानी आपल्या मुलांच्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचं आहे असे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना श्री. हुली यांनी स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी सर्व पुस्तके व शाळेतील एक खोली उपलब्ध करून देण्याचे अभिवचन दिले. सरपंच ज्ञानप्रकाश रेडेकर यांनी मुलेच आपली खरी संपत्ती आहेत. त्यांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे असे सांगितले. दक्षिण आफ्रिका येथे सेवेत असलेले दिपक पाटील यांनी आपले बालपण कसे गेले? याच शाळेत मी शिकलेलो आहे . याचा मला अभिमान वाटतो . शाळेसाठी तरुण पिढीच्या भवितव्यासाठी योगदान देण्यास आपण सदैव तयार असलेचे सांगितले.
या कार्यक्रमाला उपसरपंच सौ. वैभवी लोखंडे, श्रीमती कमल कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र रेडेकर, पांडूरंग लोखंडे, विजय पाटील, रामचंद्र लोखंडे, जितेंद्र पाटील, विक्रम रेडेकर, मोहन रेडेकर, केदारी आसवले, भाऊ पाटील, व इतर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन यल्लापा रेडेकर यांनी केले. सुत्रसंचालन व आभार श्री. सिताप यांनी मानले.








