Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

धबधबा मार्गावरील अर्धवट गटारीचे काम तातडीने पूर्ण करा

मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांचे पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन 



गडहिंग्लज : मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांना निवेदन देताना मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्यासह कार्यकर्ते.



गडहिंग्लज (प्रतिनिधी): शहरातील काळभैरी रोडवरील धबधबा मार्गावरील अर्धवट गटारीचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे तसेच गटारींचीही स्वच्छता करावी अशी मागणी मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. तातडीने कार्यवाही न केल्यास गटारीतील घाण पालिकेत आणून टाकू असा इशारा देखील या निवेदनातून मनसेने पालिकेला दिला आहे.




या निवेदनात म्हटले आहे की,  गडहिंग्लज हद्दीतील धबधबा मार्ग काळभैरी रोड या ठिकाणी सात-आठ महिन्यापूर्वी गटाराचे काम सुरु केले होते. ते अर्धवट बांधकाम करून ठेकेदाराने काम तशाच अवस्थेत काम बंद ठेवले आहे, या अर्धवट कामामुळे होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर साचून आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरून आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो  त्यामुळे तात्काळ ठेकेदाराला सांगून उर्वरित गटाराचे काम पूर्ण करून घ्यावे व असलेल्या गटारी कित्येक महिने साफ केली नसून व आजूबाजूने झाडे झुडपे वाढली  आहेत. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. ते तात्काळ स्वछ करून घ्यावे.


तसेच परिसरातील नागरिकांना सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र या ठिकाणी पाण्याची टाकी व नळ कनेक्शन याची व्यवस्था न केल्याने शौचालयाची स्वच्छताही होत नसून घाणीचे साम्राज्य दिसून येते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच परिसरातील साफसफाई होत नाही. 20 वर्षापूर्वी पाईपलाईन टाकले आहे त्यामुळे बऱ्याच वेळेला गळतीचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. तातडीने कार्यवाही न केल्यास गटारातील घाण पालिकेत आणून टाकू असा इशारा देखील या निवेदनातून मनसेने दिला आहे.



यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, शहराध्यक्ष केंप्पाना कोरी, राहुल जाधव, सुभाष दिवेकर, रोहन देवार्डे, अमोल गोडसे, सुभाष देवार्डे, सुशांत देवार्डे, प्रशांत देवार्डे, अथर्व कांबळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.