Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणातील संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा

ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने पोलीस प्रमुखांना निवेदन


कोल्हापूर : पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना निवेदन देताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, गडहिंग्लज शहर प्रमुख संतोष चिकोडे, रियाजभाई शमनजी, भरत जाधव, संदीप कुराडे, केदार डांग, जयशिवा कलकुटकी, नवनाथ शेटके आदी.


कोल्हापूर (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथील युवा उद्योजक संतोष शिंदे, पत्नी तेजस्विनी व मुलगा अर्जुन यांच्या तिहेरी आत्महत्या प्रकरणी अटक केलेल्या संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल राऊत यांना निलंबित करावे अशी मागणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडे निवेदनातून केली आहे.     



या निवेदनात म्हटले आहे की,  गडहिंग्लज शहरात उद्योजक संतोष शिंदे, त्यांची पत्नी व मुलगा यांच्या तिहेरी आत्महत्या प्रकरणाचे गडहिंग्लज शहरासह तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. याप्रकरणी शुभदा पाटील व राहुल राऊत या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील संशयित राहुल राऊत हे पोलीस खात्यात एपीआय या पदावर कार्यरत आहेत. पाटील व राऊत यांनी एक कोटी रुपयांची खंडणी उद्योजक संतोष शिंदे यांच्याकडे मागितली होती. राऊत हे पोलीस खात्याला काळीमा फासणारे अधिकारी आहेत. 



याप्रकरणी अटक करण्यात आलेले संशयित पाटील व राऊत यांची सर्व मालमत्ता जप्त करावी, या प्रकरणाचा पारदर्शक तपास होऊन संशयितांना कठोर शिक्षा व्हावी असे दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे, राऊत यांना त्वरीत निलंबित करावे, दोघाही संशयितांवर मोक्का अंतर्गतही कारवाई करावी. तसेच राहुल पाटील यांच्या मृत्युची देखील चौकशी व्हावी आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.



यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, गडहिंग्लज शहर प्रमुख संतोष चिकोडे, रियाजभाई शमनजी, भरत जाधव, संदीप कुराडे, केदार डांग, जयशिवा कलकुटकी, नवनाथ शेटके उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.