Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'पेपर प्रेझेंटेशन' मध्ये संत गजानन आयुर्वेद प्रथम

हैद्राबाद: येथे आयोजित  राष्ट्रीय स्वस्थ, आयुष आणि वेलनेस एक्पोमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्विकारताना महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋषभ बोरकर.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): हैदराबाद येथे झालेल्या भारत सरकारच्या आयुष  मंत्रालयाने आयोजित राष्ट्रीय स्वस्थ,आयुष  आणि वेलनेस एक्सपो 2023 मध्ये महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज आयुर्वेदिक महाविद्यालयाला पेपर प्रेझेंटेशन विभागातील स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. यात महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋषभ बोरकर यांनी सादर केलेल्या सादरीकरणाला तज्ञ मान्यवराकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


स्वस्थ हेल्थ अँड्रॉइड एप्लीकेशन या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात देशभरातून 350 हून अधिक महाविद्यालयाने सहभाग नोंदवला आयुर्वेद संशोधनाला चालना मिळावी या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पेपर प्रेझेंटेशन विभागातून बोरकर यांच्या सादरीकरणाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.यावेळी विजेत्याचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरवण्यात आला.


यावेळी डॉ. गोली प्रसाद, डॉ. प्रवीण संधू, डॉ. अभय दास, डॉ. सत्यदीप, डॉ. स्नेहलता डोरनाल, डॉ पेनीश्री कोंटे, डॉ.सत्य डोरनाल यांची उपस्थिती होती. तर संस्थाध्यक्ष ॲड.डॉ. आण्णासाहेब चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ.संजय चव्हाण, प्राचार्य डॉ. मंगल मोरबाळे, डॉ. प्रीती रावळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.