महागाव येथील ग्रामसभेत नागरिकांना मार्गदर्शन
![]() |
| महागाव: येथील ग्रामसभेत मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक शितल शिसाळ. यावेळी उपस्थित सरपंच प्रशांत शिंदे व इतर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सध्या कोल्हापूर जिल्ह्यात जातीय दंगली निर्माण होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून जर कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर स्टेटसला ठेवू नये अशा सूचना गडहिंग्लज पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक शितल शिसाळ यांनी दिल्या.
महागाव येथे आयोजित ग्रामसभेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. सरपंच प्रशांत शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मार्गदर्शन करताना उपनिरीक्षक शिसाळ पुढे म्हणाले, तरुण, विद्यार्थी व इतर नागरिकांनी समाजात जातीय तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह संदेश ऑडिओ, व्हिडिओ चित्रफित, छायाचित्रे आपल्या स्टेटसला ठेवणे टाळावेत. असे वादग्रस्त संदेश कोणी शेअर करू नयेत, आपल्या निदर्शनास आल्यास अशी पोस्ट तत्काळ डिलीट करावी व याची माहिती पोलीसांना तातडीने कळवावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपसरपंच संदीप कोकितकर, पोलीस पाटील प्रदीप कांबळे, उदय सोमशेट्टी, उंबरवाडीच्या पोलीस पाटील विनया सावंत, ग्रामविकास अधिकारी शशिकांत कुंभार फिरोज सोलापुरे, ग्रा.प. सदस्य विकास इंगवले, परशराम हुले, सुरज आसवले, फिरोज सोलापुरे, अर्जुन रेडेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

