Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी येथे लक्ष्मी मेडिकलचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन



गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी येथे किरण अशोक गडदराम व सौ. लक्ष्मी किरण गडदराम यांनी परीट गल्ली लक्ष्मी मंदिर रोड येथे सुरू केलेल्या 'लक्ष्मी मेडिकल'चे उदघाटन पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती  व प्रगतशील शेतकरी अरुणराव देसाई, गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.



प्रारंभी पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांच्या हस्ते फित कापून मेडिकलचे उदघाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत किरण गडदराम व मुख्याध्यापक अशोक गडदराम यांनी केले.




प्रास्ताविकात माजी मुख्याध्यापक एम.एस. इंगवले म्हणाले, सध्याच्या धावपळीच्या युगात व रासायनिक शेतीमुळे आहारात बदल झाल्याने मनुष्य औषधे गोळ्यांशिवाय जगू शकत नाही. जीवनशैलीच बदलल्याने मनुष्याला औषधे- गोळ्यांशिवाय पर्याय नाही. गडदराम कुटुंबीयांनी गरज ओळखून ग्रामस्थांसाठी तेरणी येथे सुरू केलेली मेडिकल सेवा निश्चितच कौतुकास्पद आहे. या माध्यमातून गडदराम कुटुंबीयांनी ग्रामस्थांना घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



यावेळी शुभेच्छा देताना पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक म्हणाले, गडदराम कुटुंबीयांनी तेरणी येथे मेडिकल स्टोअर सुरू करून ग्रामस्थांची चांगली सोय केली आहे. येथील ग्रामस्थांना या ठिकाणी विनम्र व चांगली सेवा या माध्यमातून मिळेल यात शंका नाही असे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या.



पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुणराव देसाई म्हणाले, ग्रामीण भागात गडदराम कुटुंबियांनी लक्ष्मी मेडिकलच्या माध्यमातून सुरू केलेली सेवा निश्चितच कौतुकास्पद आहे. मेडिकल बरोबरच या माध्यमातून रक्त तपासणी सारख्या सेवा ग्रामस्थांना देता येतील का या दृष्टीने विचार व्हावा. जेणेकरून ग्रामस्थांचा वेळ, पैसाही वाचण्यास मदत होईल व गाव पातळीवरच सेवा मिळेल असे सांगून गडदराम कुटुंबीयांना पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.




राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक जब्बार मुल्ला म्हणाले, गडदराम कुटुंबियांनी लक्ष्मी मेडिकल माध्यमातून ग्रामस्थांना माफक दरात गोळ्या- औषधे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.




गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ म्हणाले, लक्ष्मी मेडिकलच्या माध्यमातून गडदराम कुटुंबीय तेरणीकरांना उत्कृष्ट सेवा देतील. ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करून त्यांनी शुभेच्छा दिल्या.



या कार्यक्रमास प्राचार्य श्री. जोडगुद्री, माजी पोलीस पाटील शिवाजी भोगाणे, सिद्धांना देसाई, महादेव तेगनाळे, मल्लाप्पा भंगारी, करवीर नावलगी, भडगावचे माजी सरपंच भीमराव पट्टणकुडी, संदीप पट्टणकुडी, मुख्याध्यापक एस. एम. बेळळी, मौला जमादार, तौशीफ जमादार, संजय जोशी, शंकर निंबाळकर, इराप्पा चौगुले, शिवाजी जाधव, शिक्षक रमजान अंकली, भरत पाटील, भास्कर पाटील, कागलचे आनंदा पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक आर.एन.पाटील यांनी केले. मेडिकलचे मालक किरण गडदराम यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.