भिमशाप्पा मठ व रवळनाथ मंदिर समोर बसविलेल्या पेव्हिंग ब्लॉकचा लोकार्पण सोहळा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नौकुड गावामधील प्रलंबित सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी माझ्याकडे गावातील पाणीटंचाई संदर्भात पाठपुरावा केलेल्या पाझर तलावाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही आमदार राजेश पाटील यांनी दिली.
आमदार राजेश पाटील यांच्या आमदार फंडातून नौकुडमधील भिमशाप्पा मठ व रवळनाथ मंदिर समोर बसविलेल्या पेव्हिंग ब्लॉकचा लोकार्पण सोहळा रवळनाथ मंदिर समोर संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
आमदार राजेश पाटील यांच्या आमदार फंडातून नौकुड भिमशाप्पा मठ व रवळनाथ मंदिर समोरील बसविलेल्या पेव्हींग ब्लॉकसाठी निधी मंजूर करणे कामी कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष अभय देसाई, माजी पंचायत समिती सभापती अमर चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार मुन्नोळी, समाजसेवक गंगाधर व्हसकोटी, राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक जयसिंग चव्हाण, जिल्हा बँक संचालक संतोष पाटील, मजूर संघ संचालक दीपक पुजारी, नरेवाडी सरपंच अंकुश रणदिवे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी सांगितले.
यावेळी जयकुमार मुन्नोळी यांनी आपल्या मनोगतातून आमदार फंडातून गावामध्ये अनेक विकास कामे झाली आहेत. नौकुड गावचे सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर करून गावाचा विकास केला, असे म्हणाले. यावेळी गंगाधर व्हसकोटी, जयसिंग चव्हाण यांनी मनोगतात नौकुडचे सरपंच कर्तबगार आहेत. त्यांनी कामाचा पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला व गावाचा कायापालट केला असे गौरवउद्गार काढले.
सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी गावातील नार्वेकर वस्तीकडे जाणारा रस्ता, तसेच सुतार गल्ली येथील लक्ष्मी मंदिर सभागृह बांधकामासाठी निधी मंजूर व्हावा अशी विनंती केली.
यावेळी सरपंच शुक्राचार्य चोथे, उपसरपंच सौ.रेखा सरदेसाई, ग्रा. पं.सदस्या सौ. सुवर्णा गोसावी, सौ. सुरेखा गुरव, ग्रामसंघ अध्यक्षा सौ.शितल मांगले, कॉन्ट्रॅक्टर श्री. मोकाशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शुक्राचार्य चव्हाण, देवस्थान कमिटी अध्यक्ष सुनिल शेलार, तंटामुक्ती समिती अध्यक्ष भाऊसाहेब लोहार, विवेकानंद नार्वेकर, संभाजी चौगुले, हरीश खंडागळे, चाळू गुरव,सचिन गोडसे, पांडुरंग कदम, सुकुमार गुरव, ग्रा. पं. चे कर्मचारी, गावातील आजी- माजी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत बाळासाहेब पाटील यांनी केले. आभार सचिन गोडसे यांनी मानले.
बातमीचे व्हिडिओ पाहण्यासाठी 👇🏼






