Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नेसरी उर्दू विद्यामंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत



गडहिंग्लज (प्रतिनिधी): उर्दू विद्यामंदिर नेसरी शाळेत नवागतांचा स्वागत सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.



प्रवेशोत्सव अंतर्गत मोफत शैक्षणिक, लेखन साहित्य, मोफत पाठयपुस्तके व शालेय दप्तर , टिफीन बॅग वाटप करण्यात आले. यावेळी बदलीने हजर झालेले शिक्षक मुबारक लाटकर यांचे शाळा व्यवस्थापन समिती मार्फत स्वागतपर सत्कार करणेत आला. या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती, गावातील दानशूर व्यक्ती व शाळेच्या हितचिंतकांचे योगदान लाभले.





कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरीफ चौगले यांनी केले. सर्व उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापक रिजवान माणगांवकर यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.