Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माजी सैनिक कल्याण विभागाने रोजगार निर्मितीसाठी खाजगी क्षेत्रासोबत केला सामंजस्य करार

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाअंतर्गत  पुनर्वसन महासंचालनालय आणि मे. कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यात आज 12 जून रोजी नवी दिल्ली येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.



पुनर्वसन महासंचालनालय आणि कॉर्पोरेट्स यांच्यातील सामंजस्य करार, संरक्षण सेवांच्या सन्माननीय माजी सैनिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याकरिता  कॉर्पोरेट कंपन्या आणि माजी सैनिकांना एका समान व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न आहे.



“या भागीदारीमुळे आमच्या माजी सैनिकांना उद्योग आणि कॉर्पोरेट्समध्ये अधिक संधी  मिळेल आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल. तसेच  आमच्या माजी सैनिकांना एक सन्माननीय दुसरी कारकीर्द मिळेल'', असे पुनर्वसन महासंचालनालयाचे महासंचालक मेजर जनरल शरद कपूर, यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.