Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर



नवी दिल्ली :  नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दिनांक 28 मे रोजी झालेल्या या पूर्वपरीक्षाच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षासाठी उमेदवार पात्र ठरले आहेत.



या उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती आहे. परीक्षेच्या नियमांनुसार या सर्व उमेदवारांना नागरी सेवा मुख्य परीक्षासाठी विस्तृत आवेदन प्रपत्र -I (डीएएफ -I) रूपात पुन्हा अर्ज करावा लागेल. डीएएफ- I भरण्यासाठीच्या तारखा आणि महत्त्वाच्या सूचना आणि तो पाठवण्यासंदर्भातली  माहिती  आयोगाच्या संकेतस्थळावर योग्य वेळी जाहीर केली  जाईल.


उमेदवारांना असेही सूचित केले जाते की, नागरी सेवा परीक्षा, 2023 ची  संपूर्ण प्रक्रिया समाप्त झाल्यावर  म्हणजे अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर नागरी सेवा  पूर्वपरीक्षा चे गुण, कट ऑफ मार्क्स  आणि उत्तर विवरणी  आयोगाच्या संकेतस्थळावर   https://upsc.gov.in   अपलोड केले जातील.


केंद्रीय लोकसेवा आयोगाचे धौलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली येथे परीक्षा हॉल भवनजवळ एक सुविधा केंद्र  आहे. उमेदवार वरील परीक्षेच्या निकालाबाबत कोणतीही माहिती/स्पष्टीकरण यासाठी  वैयक्तिकरित्या किंवा दूरध्वनी क्रमांक  011-23385271, 011-23098543 किंवा  011-23381125  सर्व कामकाजाच्या दिवसात सकाळी 10.00 ते  संध्याकाळी 5.00 या वेळेत संपर्क साधू शकतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.