Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करा

न्यू युवा मंचच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन






गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी न्यू युवा मंचच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन मंचचे अध्यक्ष  काशिनाथ गडकरी, अभिजीत पाटील यांनी दिले आहे.



या निवेदनात म्हटले आहे की,  गडहिंग्लज शहरात काही हॉटेल, रस्त्यावरील खोक्यांवर तसेच मैदानांवर अवैध धंदे सुरू आहेत. या धंद्यांना वेळीच चाप लावणे आवश्यक आहे. त्याचबरोबर फसवणूक, चोऱ्यामाऱ्या यांचे प्रमाण देखील वाढत आहे. ए. आर. ट्रेडर्समध्ये फसवणूक केलेल्या एजंटांविरोधात तक्रार दाखल करून घेतली जात नाही. त्याचबरोबर तालुक्यातील काही  व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सोयाबीनचे निम्मे पैसे अद्याप देणे बाकी असताना देखील उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही न्याय मिळणे अपेक्षित आहे. काही महिन्यापूर्वी डॉक्टर कॉलनीत झालेल्या मोठ्या चोरीचा छडा अद्याप लागलेला नाही. 



२०१५ मध्ये महालक्ष्मी यात्रा कमिटीने शहरातील २१ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या सीसीटीव्हीचे स्क्रीन गडहिंग्लज पोलीस ठाण्यात आहे. मात्र सध्या हे सीसीटीव्ही बंद अवस्थेत आहेत. हे कॅमेरे कार्यान्वित करणे गरजेचे आहे. आदी प्रश्नांकडे या निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.