Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नौकुड येथे पाच लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

आमदार राजेश पाटील यांच्या फंडातून निधी मंजूर 


सरपंच शुक्राचार्य चोथे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यक्रम 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): नौकुडचे सरपंच शुक्राचार्य चोथे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन नौकुड येथे रवळनाथ मंदिर समोरील खुली जागा तसेच चौगुले गल्ली (प्रभाकर चौगुले) येथील रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. या विकास कामांसाठी आमदार राजेश पाटील यांच्या फंडातून ५ लाख रुपये निधी मिळालेला आहे.



आमदार राजेश पाटील यांच्या आमदार फंडातून नौकुड गावांसाठी निधी मंजूर मंजूर करणे कामी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अभय देसाई, पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार मुन्नोळी, समाजसेवक गंगाधर व्हसकोटी, जयसिंग चव्हाण यांचे सहकार्य लाभले.




या ५ लाख रुपये निधीच्या कामाचे उदघाटन ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी बोलताना सरपंच शुक्राचार्य चोथे म्हणाले, पुर्वी गावामध्ये आमदार फंडातून 30 लाख रुपयांची कामे झाली आहेत. येथील अंतर्गत रस्ते, पाझर तलाव, दलित वस्तीमध्ये साकव पूल तसेच गावातील मुलांसाठी अभ्यासिका सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी संजय डवरी, शितल मांगले यांनी मनोगते व्यक्त केली. 



यावेळी सरपंच शुक्राचार्य चोथे, ग्रामसेवक विजय जाधव, उपसरपंच सौ.रेखा सरदेसाई, सदस्य सौ. सुवर्णा गोसावी, सौ. सुरेखा गुरव, ग्रामसेवक अध्यक्षा सौ.शितल मांगले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शुक्राचार्य चव्हाण, माजी उपसरपंच भिमराव गोडसे, देवस्थान कमिटी अध्यक्ष सुनिल शेलार, तंटामुक्त समिती अध्यक्ष भाऊसाहेब लोहार, विवेकानंद नार्वेकर, संजय डवरी, श्रीकांत गुरव, जोतिबा मांगले, महादेव गोईलकर, चाळू गुरव, सचिन गोडसे,भरत कदम, राकेश चव्हाण, अमोल मांगले, ग्रा.पं.चे कर्मचारी, गावातील आजी- माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार ग्रामसेवक विजय जाधव यांनी मानले.


  बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी 👇🏼



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.