Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साधना हायस्कूलमध्ये सेवानिवृत्ती निमित्त प्राचार्य जी. एस. शिंदे यांचा सत्कार

गडहिंग्लज : येथील साधना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य जी. एस. शिंदे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक नेते दादा लाड, शिक्षण संस्थेचे सचिव जे. बी. बारदेस्कर, उपाध्यक्ष चंद्रकांत गुजर यांच्यासह इतर.
                                (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार) 

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील साधना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य जी. एस. शिंदे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी साधना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे होते. यावेळी शिक्षक नेते दादा लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.




स्वागत व प्रास्ताविक साधनाचे नूतन प्राचार्य आर. एन. पटेल यांनी केले. यावेळी बोलताना श्रीपतराव शिंदे म्हणाले, शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो, शिक्षण ही अखंड चालणारी प्रकिया आहे. त्यामुळे अखंड ज्ञान देण्याचे काम जी. एस. शिंदे यांनी करावे. साधनाचा विद्यार्थी ते प्राचार्य पदापर्यंत प्रेरणादायी प्रवास आपल्या ३५ वर्षांच्या सेवाकालात जी. एस. शिंदे यांनी केला. कोल्हापूर जिल्ह्यातील तज्ञ गणित शिक्षक म्हणून गंगाराम शिंदे प्रसिद्ध आहेत. आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. असे गौरवोद्गार त्यांनी काढले.




याप्रसंगी साधना शिक्षण संस्थेचे सचिव जे. बी. बारदेस्कर, उपाध्यक्ष चंद्रकांत गुजर, बी. जी. काटे, के. बी. पोवार, एम. डी. पाटील, दत्ता देशपांडे, राजेंद्र खोराटे, बी. एस. काटे, टी. बी, चव्हाण, प्रा. दत्ता पाटील, ॲड.  दिग्विजय कुराडे यांनी आपल्या मनोगतातून गंगाराम शिंदे यांच्या सेवेतील आठवणी ताज्या केल्या.



सत्काराला उत्तर देताना श्री. शिंदे म्हणाले,  मी अत्यंत कठीण परिस्थितीतून माझे शिक्षण पूर्ण केले. आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहिले पाहिजे. माझा केलेला हा सन्मान आयुष्यभर स्मरणात राहील. यापुढे ज्यावेळेला माझी गरज लागेल तेव्हा मी आपल्याला सहकार्य करेन अशी भावना त्यांनी व्यक्त केली.



कार्यकमास सौ. फिलॉन बारदेरकर, सौ. अश्‍विनी देसाई, सौ. वैशाली भिऊंगडे, सचिन शिंदे इतर शाळांचे गुख्याध्यापक, माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यकमाचे सुत्रसंचालन जे. के. सोझ, जी. बी. पाटोळे व निलोफर शेख यांनी केले. आभार साधना प्रशालेचे पर्यवेक्षक अरविंद बारदेस्कर यांनी मानले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.