Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणातील संशयितांवर कठोर कारवाई करा : विजय देवणे

गडहिंग्लज : पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्याशी चर्चा करताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे. यावेळी उपस्थित रियाजभाई शमनजी व इतर.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील युवा उद्योजक संतोष शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयितांवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली.



जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सोमवारी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सदर आत्महत्या प्रकरणाची माहिती घेत या प्रकरणातील संशयितांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत गडहिंग्लज शहर प्रमुख संतोष चिकोडे, रियाजभाई शमनजी उपस्थित होते. दरम्यान, श्री. देवणे यांनी उद्योजक संतोष शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देत संतोष यांच्या आई व बहिणीचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.