गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव येथील डोंगरावरील श्री गुडादेवीची यात्रा दिनांक २० जून रोजी होत आहे.
भडगावसह चोथेवाडी, समर्थनगर बंदीवसाहत, बेरडवाडी, चव्हाण वाडी, भोई तळ, मरगुद्रीवाडी, मुकनावरतळ, कौजलगी तळ दत्तनगर येथून भाविक मंगळवारी पहाटे पासुन देवीला अभिषेक घालण्यासाठी गरम पाण्याच्या घागरी घेऊन जाणार आहेत. यावेळी अभिषेक, पूजा, आरती करण्यात येणार आहे. हा धार्मिक विधी पार पडल्यानंतर सर्व भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले केले जाणार आहे.
सायंकाळी पाच वाजता गावातील गुडादेवी मंदिरा पासुन पालखी मिरवणूक सुरू होऊन मुख्य रस्त्यावरून डोगंरावरील मंदिराकडे पालखी जाणार आहे. मिरवणूक झाल्यानंतर मंदिरात आरती करून यात्रेची सांगता होईल.

