Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गांजा प्रकरणातील फरार संशयितांना गजाआड करण्यात गडहिंग्लज पोलिसांना यश

गडहिंग्लज: गांजा प्रकरणातील अटक केलेल्या संशयितांसमवेत पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, पोलीस निरीक्षक गजानन सरगर, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, शितल शिसाळ व इतर.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील हेब्बाळ कसबा नूल येथे शेतात गांजाची झाडे लावल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार दोघा संशयितांना गडहिंग्लज पोलिसांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी 17 जून रोजी कोल्हापूर येथील गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली होती. मात्र या प्रकरणातील दोघे संशयित फरार होते. गडहिंग्लज पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. विष्णू सर्जाप्पा पिरापगोळ, काशाप्पा विष्णू पिरापगोळ अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.  



तालुक्यातील गडहिंग्लज- संकेश्वर या आंतरराज्य मार्गावर हेब्बाळ कसबा नूल येथे हसुरचंपू रोडजवळ शेतात विष्णू पिरापगोळ व काशाप्पा पिरापगोळ यांनी ऊस पिकात गांजाची लागवड केल्याची खबर कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला(एलसीबी) मिळाली होती. यानुसार या पथकाने  अचानक छापा टाकला. यावेळी संशयितांनी उसाच्या शेताच्या आडोशाला लावलेली एकूण ७५ गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली होती. ही गांजाची झाडे सात ते आठ फूट उंचीची होती. छापा पडताच यातील संशयित फरार झाले होते. यावेळी १०७ किलो ४०० ग्रॅम वजनाचा एकूण ७ लाख ५७ हजार रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला होता. गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे यांनी करत फरार झालेल्या या दोघाही संशयितांचा शोध घेवून त्यांना गजाआड केले. याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.