गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. सेमी इंग्रजी माध्यमाचा १०० टक्के तर मराठी माध्यमाचा निकाल ९९ टक्के लागला आहे.
प्रशालेमध्ये प्रथम क्रमांक प्रांजली पाटील ( ९५ टक्के), द्वितीय क्रमांक समर्थ पाटील ( ९२.४० टक्के), तृतीय क्रमांक अनिरूद्ध सावंत ( ८७.२०टक्के) चौथा क्रमांक विभागून श्रेया कांबळे व अतुल चिमने (८७ टक्के ), पाचवा क्रमांक विभागून सोनल पाटील व समर्थ जमदाडे ( ८३.४० टक्के) गुण मिळवून यश संपादन केले आहे.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे समर्थ महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव पाटील, प्राचार्य आय.एस.पाटील, संस्था प्रतिनिधी प्रा. डी.एस.पाटील, आण्णासाहेब पाटील पर्यवेक्षक अशोक नांदुलकर यांनी अभिनंदन केले.

