शंभरहून अधिक लोक अडकल्याची भीती
बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल
मुंबई : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळल्याने या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आले आहे. येथील जवळपास 16 ते 17 घरांवर दरड कोसळली आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू झाले आहे. दुर्घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने भेट देत बचाव कार्याबाबत मार्गदर्शन केले.
येथील 15 ते 17 घरांवर माती पडल्याने ते ढिगाऱ्याखाली सापडले आहेत. काल रात्री बाराच्या सुमारास दरड कोसळली. आतापर्यंत 75 जणांना ढिगार्यातून बाहेर काढण्यात एनडीआरएफ व स्थानिक टीमच्या लोकांना यश आले आहे.
