Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'संत गजानन' अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद



गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध शाखेमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्याकडून प्रतिसाद मिळत आहे. एकूण ३०० जागेसाठी प्रवेश होणार असून यामध्ये पहिल्याच दिवशी पहिल्याच फेरीमध्ये १०४ विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाला प्रथम पसंतीक्रम देऊन प्रवेश निश्चित केला आहे.



चालू शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बुधवारपासून फेरीला सुरुवात झाली. यामध्ये कोळकी (ता.चंदगड ) येथील निकिता गावडे हिने कॉम्प्यूटर सायन्स ॲन्ड  इंजिनिअरींग या अभ्यासक्रमाला आपला प्रवेश  निश्चित करून प्रथम प्रवेशीत होण्याचा मान मिळवला. तिने सीईटीमध्ये ८५.४१ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती. याबद्दल तिचे प्राचार्य डॉ. एस.एच.सावंत यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.



"गेल्या दशकापासून संत गजानन अभियंत्रिकीत गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी प्राधान्य दिला जात आहे यामुळेच या विभागातील विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी पहिली पसंती आपल्यालाच मिळत आहे यावर्षी अंतीम वर्षाच्या सर्वाधिक १५४ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत प्लेसमेंट झाली असल्याची माहिती विश्वस्त डॉ. संजय चव्हाण यांनी यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.