शालेय मंत्रीमंडळ निवडणुकीद्वारे समजावून घेतली मतदानाची प्रक्रिया
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नेसरी येथील उर्दू विद्यामंदिर येथे शालेय निवडणूक उत्साहात पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावत निवडणुकीची पद्धत समजावून घेतली. यामध्ये एम एस धोनी सत्तारूढ विद्यार्थी आघाडी (विमान) व मीराबाई चानू विद्यार्थी आघाडी (कपबशी) अशा दोन पॅनलमध्ये चुरशीने झालेल्या मतदानामध्ये मीराबाई चानू विद्यार्थी आघाडी पॅनलने 15च्या मताधिक्याने सत्तारूढ पॅनलच्या सर्व उमेदवारांचा पराभव केला.
साबीर माणगांवकर, सौ.अनिसा वाटंगी, सौ. नेहा नूलकर, सौ. आरीफा वाटंगी यांनी मतदान अधिकारी म्हणून काम पहिले. पालक वर्गातून सौ.शबनम बागवान, सौ. मिनाज शेख, अकरम बाणदार उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शाहिजाद वाटंगी, सदस्य शहारून पिरजादे, अल्ताफ खेडेकर, वसीम नुलकर यांनी मतमोजणी अधिकारी म्हणून काम केले. मुस्लिम सुन्नत जमात नेसरीचे सेक्रेटरी साबीर वाटंगी यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या शालेय उपक्रमासाठी ग्राम पंचायत सदस्य सौ. रुखसार नूलकर व किरण हिडदुग्गी तर डॉ. अब्दुलकलाम एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन उस्मान कदिम, व्हा.चेअरमन शाहीजाद वाटंगी व सेक्रेटरी शहारून पीरजादे उपस्थित होते.
शाळेतील शिक्षक मुबारक लाटकर व अझहरुद्दिन लतीफ यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांना रिजवान माणगांवकर, आसीफ मुजावर, आरीफ चौगुले व कु. जैनाब बागवान यांचे सहाकार्य लाभले.
मीराबाई चानू विद्यार्थी आघाडी पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांचे ग्राम पंचायत सदस्य सौ रूखसार नूलकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.


