Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लंडनमध्ये शिकणाऱ्या सेजलने महागावमधील 'म.फुले'च्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचा दिला कानमंत्र

सेजलने विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती केली दूर 


महागावच्या महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांशी साधला  संवाद





गडहिंग्लज (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील विद्यार्थी इंग्रजी विषयाचा न्यूनगंड मनात बाळगताना दिसतात. या पार्श्वभूमीवर लंडन येथे शिक्षण घेणारी व मूळची गडहिंग्लज तालुक्यातील  इंचनाळ या गावच्या सेजल जाधव हिने महागावच्या महात्मा फुले विद्यालयाला भेट देत इंग्रजी विषय कसा सोपा आहे. याचा कानमंत्र विद्यार्थ्यांना देत इंग्रजी विषयाची विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती दूर केली.     

       



इंचनाळ येथील उदयसिंह जाधव व पत्नी सरिता हे आपल्या नोकरी निमित्त लंडनमध्ये स्थायिक झाले आहेत.  लंडन येथील ' द लॉंग एथॉन स्कूल ' या शाळेतून नुकतीच दहावी पास झालेली त्यांची कन्या सेजल हिने महागावच्या महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजला भेट दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत इंग्रजी विषयाविषयी असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. तिने दिवसभर शाळेतील विविध उपक्रमाविषयी माहिती घेतली. विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यामुळे विद्यार्थीही भारावून गेले.

        



शाळेच्या वतीने सेजलचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी तिने लंडनमधील शाळेतील शिकवण्याची पद्धत, वेगवेगळे उपक्रम, सक्तीचे व ऐच्छिक विषय, परीक्षांचा कालावधी, शाळेचा गणवेश, शाळेची वेळ, वेळापत्रकातील तासांचा कालावधी याविषयीचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर सांगितले. तिला मराठी समजत होते.पण बोलता येत नव्हते. त्यामुळ इंग्रजी विषयाचे शिक्षक मोहन कांबळे व संदेश कोकितकर यांनी दुभाषकाची भूमिका सेजल व विद्यार्थ्यांच्यात संवाद साधला.विद्यार्थ्यांना तिचे विचार सांगितले जात होते व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्न सेजलला विचारत होते. तिचे इंग्रजी भाषेची उच्चार ऐकून विद्यार्थीही भारावून गेले.

       



यावेळी शाळेतील शिक्षक पर्यवेक्षक अशोक नांदुरकर, सुभाष सुतार,भीमराव भुईंबर, एकता पाटील, रमेश कळविकट्टे, लता देसाई यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.