Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेतकरी सेनेच्या करवीर उप तालुकाप्रमुख पदी अभिजित पाटील



कोल्हापूर : हलसवडे येथील अभिजित पाटील यांची करवीर तालुका शेतकरी सेनेच्या उपतालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली.




अभिजित पाटील हे गेली 10 वर्षे शाखा प्रमुख म्हणून काम करत असताना शिवसेना पक्ष वाढीसाठी केलेल्या कामाची दखल शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पोवार यांनी घेत शिवसेना अंगीकृत असलेल्या शेतकरी सेनेच्या करवीर उपतालुकाप्रमुख पदी निवड केली आहे.




निवड करण्यासाठी उपजिल्हा प्रमुख अवधूत साळुंखे, करवीर तालुका प्रमुख विनोद खोत, शंकर खोत यांच्या सहकार्य लाभले. तर निवडीचे पत्र कोल्हापूर संपर्कप्रमुख अरुणभाई  दुधवडकर यांच्या हस्ते शाहू स्मारक कोल्हापूर येथे देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, मुरलीधर जाधव, माजी आमदार सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, शहरप्रमुख रवीकीरण इंगवले, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तूरे, उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.