Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात प्रा. एन. बी. ईकिले यांना पीएच. डी.



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात हिंदी विभाग प्रमुख प्रा. एन. बी. ईकिले यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे हिंदी विषयामध्ये पीएच. डी. पदवी प्राप्त केली.




प्रा. एन. बी. ईकिले यांनी "इक्कीसवीं सदी के प्रतिनिधि उपन्यासों में पारिस्थितिकी विमर्श" या विषयावर प्रबंध सादर केला असून त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी हिंदी विभागप्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयात शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांच्या हस्ते पीएच.डी.प्राप्त प्रा. ईकिले यांचा सत्कार करण्यात आला.




यावेळी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी केमिस्ट्री विभाग प्रमुख डॉ. एम. हसुरे, पदव्यूत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, ग्रंथपाल संदीप कुराडे, रजिस्ट्रार डॉ. संतोष शहापूरकर यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.