Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मेघा धारवाडकर एम.एस.सी नर्सिंगमध्ये सुवर्ण पदक विजेती

                                               (छायाचित्र : मज्जीद किल्लेदार) 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): मेघा शिवाजी धारवाडकर हिने के.एल.ई विद्यापीठ बेळगावच्या एम.एस.सी नर्सिंग कोर्समध्ये सर्वोत्कृष्ट गुण मिळवत सुवर्णपदक विजेती ठरली. तिला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते सुवर्ण पदक देणेत आले. याप्रसंगी के.एल.ई चे अध्यक्ष प्रभाकर कोरे व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच तिने ''बेस्ट रिर्सचर' व “बेस्ट आऊट गोईग" स्टुडंटचा मान पटकावला.




कु. मेघा शिवाजी धारवाडकर ही साधना हायस्कुल व ज्यु. कॉलेजची विद्यार्थीनी होती. ती एक उत्कृष्ट खेळाडू असून तीची पटियाला पंजाब येथे झालेल्या डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या कप्तानपदी निवड झाली होती. कु. मेघा धारवाडकर हिच्या विशेष कामगिरी व यशाबद्दल साधना हायस्कुलमार्फत तिचा व तिच्या वडिलांचा सत्कार करणेत आला. यावेळी साधनाचे सचिव जे. बी. बारदेस्कर, प्राचार्य आर. एन.पटेल व पर्यवेक्षक अरविंद बारदेस्कर याचे हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. तिला तिचे वडिल शिवाजी धारवाडकर, आई सौ. निता धारवाडकर, प्राचार्य जे.बी. बारदेस्कर यांचे मार्गदर्शन लाभले.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.