Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी धरणात गळाला लागला पाच किलोचा मासा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील तेरणी धरणात एका तरुणाने टाकलेल्या गळाला चक्क पाच किलोचा मासा लागला आहे. कटला जातीचा हा मासा असून गळाला एवढा मोठा मासा लागल्याने याची चर्चा मात्र झाली. 



तेरणी येथील धरणात कटला, सुप्रीम, रोहू, क्लॅप जातीचे चवदार मासे आहेत. येथील मासे हे तेरणी, हलकर्णी, गडहिंग्लज बाजारपेठेत पाठवले जात होते. या माशांना मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे. येथील करवीर भोई व प्रदीप भोई यांच्याकडून धरणात मासेमारी केली जाते. सध्या या माशांची विक्री तेरणीतच केली जाते. 




या पाठोपाठ छंद म्हणून गावातील काही युवक व तरुण गळ टाकून मासेमारी करतात. बुधवारी येथील शहाजी मगदूम यांना गळाला चक्क पाच किलोचा मसाला लागला. याची चर्चा तेरणीत झाली. या पाच किलोच्या माशाने मात्र सर्वांचे लक्ष वेधले. यापूर्वी देखील दोन वेळा काही जणांना असे मोठे मासे गळाला लागल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.