गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने महाराष्ट्रीय बेंदूर सणानिमित्त घेण्यात आलेल्या विविध गटातील सुदृढ बैलजोडी स्पर्धेत बैलजोडी गटात सुनील पाटील, निलजी, बिनदाती गटात मोहित डोमणे, गडहिंग्लज, दोन दाती गटात अमित पाटील, गडहिंग्लज, चार ते सहा दाती गटात बाळेश नाईक, बसर्गे यांच्या बैलजोड्यांनी प्रथम क्रमांक पटकावले. विजेत्या बैलजोड्यांच्या मालकांना मंडळाकडून पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचा अन्य निकाल असा - द्वितीय ते चतुर्थ क्रमांक : बिनदाती गट - जमीर नदाफ गडहिंग्लज, महेश कोदळी, गडहिंग्लज, काळाप्पा देसाई, इदगुच्ची. दोन दाती गट : साईनाथ पाटील व वैभव पाटील, गडहिंग्लज, अशोक खवणे, नूल, भीमसेन विटेकरी, रामगोंडा पाटील (दोघांनाही विभागून क्रमांक). चार ते सहा दाती गट : अमोल पाटील, गडहिंग्लज, अभिजीत मोळदी, गडहिंग्लज, शशिकांत कोड्ड, गडहिंग्लज. बैलजोडी गट : शिवराज शिंदे, गडहिंग्लज, काशिनाथ बेळगुद्री गडहिंग्लज, महेश रेडेकर, गडहिंग्लज.
या स्पर्धेतील विजेत्या बैलजोड्यांच्या मालकांना माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे, पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे, ठाकरे पक्ष शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, रियाजभाई शमनजी, शहर प्रमुख संतोष चिकोडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. प्रत्येक गटात चार विजेते क्रमांक काढण्यात आले. विजेत्यांना अनुक्रमे २० हजार, १५ हजार, १० हजार, ५ हजार व ढाल असे आकर्षक बक्षीसे देण्यात आली. या स्पर्धेत मोठ्या संख्येने बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. पारंपारिक वाद्यांच्या गजरात बैलजोड्यांना मिरवणुकीने स्पर्धेच्या ठिकाणी आणले जात होते.


