गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथे शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने महाराष्ट्रीय बेंदूर निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सुदृढ बैलजोडी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरवर्षी मंडळाच्या वतीने या स्पर्धा घेण्यात येतात. या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम या मंडळाच्या वतीने करण्यात येते. विविध गटात या स्पर्धा पार पाडल्या जातात. विजेत्या बैलजोड्यांना मंडळाकडून विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात येतात. गडहिंग्लजमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेची छायाचित्रकार मज्जिद किल्लेदार यांनी टिपलेली छायाचित्रे...... पहा छायावृत्तच्या माध्यमातून.....👇🏼













