गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी येथे डॉ. श्रीधर सुबराव बेळी यांच्या श्रीशा क्लिनिकचे उदघाटन राष्ट्रवादी जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष डॉ.गंगाधर व्हसकोटी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जि.प. सदस्य जयकुमार मुन्नोळी व माजी पंचायत समिती सभापती अमरसिंह चव्हाण, पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुणराव देसाई, शिवप्रसाद तेली यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्या हस्ते फीत कापून क्लिनिकचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत डॉ.श्रीधर बेळी तर प्रस्ताविक मुख्याध्यापक सुबराव बेळी यांनी केले.
यावेळी डॉ. गंगाधर व्हसकोटी, अमरसिंह चव्हाण, अरुणराव देसाई यांनी आपल्या मनोगतातून डॉ. श्रीधर बेळी यांना ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी तेरणी येथे दवाखाना सुरू केल्याबद्दल कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास डॉ. स्वप्निल चव्हाण, डॉ अमोल पोवार, डॉ. किरण गोरुले, डॉ. अमोल जाधव, डॉ. निलेश राजमाने, डॉ. अमृत इंजल यांच्यासह माजी सरपंच सौ. सुनिता सुतार, ग्रामपंचायत सदस्या सौ.मंजुळा चौगुले, सौ. सुरेखा कतिगार, माजी सरपंच मोसीम मुल्ला, जब्बार मुल्ला, ए.आय.नरेवाडी, शंकर निंबाळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य रवी इंगवले, माजी सैनिक सदाशिव तोडकर, माजी शिक्षक मल्लाप्पा भंगारी, शिक्षक रमजान अंकली, मल्लिकार्जुन यादगुडी, करवीर नंद्यापगोळ, भास्कर पाटील, कामांन्ना नाईक, करवीर कागीनकर, बसवराज फडके, स्वप्निल इंगवले, गुरुनाथ तेली, महादेव तेगनाळे, बाबासाहेब देसाई, किरण चौगुले यांच्यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सुनील कांबळे यांनी केले. आभार जब्बार मुल्ला यांनी मानले.





