Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमध्ये गल्लीबोळात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

शिवसेना ठाकरे पक्षाची मागणी 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरात गल्लीबोळांसह रस्त्यांवर कळपाने फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांनी केली आहे.



या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज शहरामध्ये गल्ली बोळात, कॉलनीत, रस्त्यावर, चौका - चौकात भटक्या कुत्र्यांचा कळप रात्रंदिवस फिरताना दिसतात. पहाटे पाच ते सकाळी दहा या वेळेत पेपर वाटप करणारी मुले, दूध घालणारे शेतकरी, मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांची नेहमी वर्दळ असते. हा भटक्या कुत्र्यांचा कळप भुंकत त्यांच्या अंगावर येण्याचे प्रकार वाढले आहेत.



दुचाकीवरुन जाणाऱ्या- येणाऱ्या वाहनधारकांचा पाठलाग ही भटकी कुत्रे करत असल्याने अपघाताच्या घटनाही घडत आहेत. पालिकेने तातडीने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.