गडहिंग्लज (प्रतिनिधी): संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय येथील तृतीय व अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विभागामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी "आर्डीनीयो फोर अब्सुल्यूट बिगिनर" ही 5 दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे आर्डीनीयो कसा वापरायचा त्याचबरोबर दैनंदिन जीवनामधल्या बऱ्याचशा गोष्टी जसं की ब्लूटूथद्वारे घरातील एसी अथवा लाईट बंद करणे, फॅन बंद करणे, वायफाय मॉड्युल याचा उत्कृष्ट वापर कसा करणे त्याचबरोबर वेगवेगळी उपकरणे कंट्रोलर द्वारे बंद चालू करणे, इंडस्ट्रीमध्ये लागणारे वेगवेगळे सेंसर इंटरफेस व कंट्रोल करणे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळा अंतर्गत विद्यार्थ्यांना माहिती तसेच प्रात्यक्षिक करून दाखवण्याचे काम या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. सुशील संकपाळ व प्रा. विकास साळुंखे यांनी केले.
शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रकल्प यांचे सादरीकरण केलं आणि सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान केल्याची माहिती विभागाचे प्रमुख प्रा. अमरसिंह फराक्टे यांनी सांगितले. कार्यशाळेचे उदघाटन प्राचार्य डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. अशा उत्कृष्ट उपक्रमाबद्दल प्राचार्य डॉ. संजय सावंत यांनी समाधान व्यक्त केले. कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी प्रा. सचिन माटले, प्रा. राहुल देसाई, प्रा. देवानंद पाटील विविध विभागांचे विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


