Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन



मुंबई : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.  


           

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.


           

'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे ब्रिटिशांना ठणकावून सांगताना लोकमान्य टिळक यांनी तरुणांच्या मनात स्वातंत्र्य संग्रामाचे चैतन्य निर्माण केले. ते तत्त्वचिंतक, पत्रकार आणि प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांच्या परखड लेखन आणि वाणीने ब्रिटिश सत्तेला हादरे बसले. भारतातील सामाजिक - शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा विविध स्तरांवरील ऐक्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. अशा या भारत मातेच्या सुपुत्राला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन,' असेही मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे.




उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई येथील शासकीय निवासस्थानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.