Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव येथे घराची भिंत कोसळल्याने नुकसान



गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव येथे मुसळधार पावसामुळे येथील श्रीमती शिवाका शटयाप्पा धनगर यांच्या राहत्या घराची भिंत कोसळल्याने नुकसान झाले आहे.




याबाबतची अधिक माहिती अशी की, रविवारी सकाळी सहाच्या सुमारास मुसळधार पावसामुळे मुख्य रस्त्यालगत पोलिस पाटील उदय पुजारी यांच्या घराच्या बाजूस असणाऱ्या श्रीमती शिवाका शटयाप्पा धनगर यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. या भिंतीखाली घरातील इतर साहित्यही सापडल्याने नुकसान झाले आहे. यामुळे धनगर कुटुंबियांचे अंदाजे ऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.