Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात सेट परीक्षेतील उत्तीर्णांचा सत्कार



गडहिंग्लज (प्रतिनिधी):  येथील शिवराज महाविद्यालयात पुणे विद्यापीठाच्या सेट २०२३ या परीक्षेत उत्तीर्ण प्राध्यापक व माजी विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला, अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे होते.



प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्र समन्वयक प्रा.एन.बी.ईकिले यांनी केले. या कार्यक्रमात पुणे विद्यापीठाच्या सेट २०२३ परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रा.विश्वजीत कुराडे (रसायनशास्त्र), प्रा.वैशाली कळसगोंडा (संगणकशास्त्र), प्रा.बियामा वाटंगी (कॉमर्स), प्रा.तंजीला काझी (फूड सायन्स), माजी विद्यार्थी मंदार गुरव (भौतिकशास्त्र) आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. 



डॉ.राजेंद्र गुंडे यांनी आपल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सेट उत्तीर्ण झालेल्यांचे अभिनंदन केले. तसेच भविष्यात नोकरी करताना येणार्‍या मर्यादा व जबाबदारी काय आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सेट ही परीक्षा उत्तीर्ण होणे हे खडतर आहे. जे आम्हाला शक्‍य झाले नाही ते माझा चिरंजीव विश्वजित व महाविद्यालयातील प्राध्यापक यांनी यशस्वी करून दाखविले आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो असे स्पष्ट करून सर्व सेट उत्तीर्णांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी आपल्या मनोगतामध्ये एकाचवेळी महाविद्यालयाचे शिक्षक आणि माजी विद्यार्थी सेट उत्तीर्ण झाले आहेत हे नक्कीच आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे यश असल्याचे स्पष्ट केले. शिवराज महाविद्यालयाच्या गौरवशाली वाटचालीतला हा आनंददायी क्षण आहे, याचा आम्हाला अभिमान आहे असे सांगून सर्वांचे अभिनंदन केले. डॉ.राजेंद्र गुंडे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.एस.जी.मुंज, प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांनीही आपल्या मनोगतातून सेट मधील सर्व यशस्वीतांचे अभिनंदन केले.




या कार्यक्रमास केमिस्ट्री विभाग प्रमुख डॉ.ए.एम.हसुरे, नॅकचे समन्वयक प्रा. किशोर अदाटे, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, ग्रंथपाल संदीप कुराडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अशोक मोरमारे यांनी केले तर आभार डॉ.महेश चौगुले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.