Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी येथे डॉ. प्रसन्न चौगुले व डॉ. किरण मराठे यांचा सत्कार



गडहिंग्लज (प्रतिनिधी): दर रविवारी दवाखाना सुरू करून हलकर्णी येथील रुग्णांची गैरसोय दूर केल्याबद्दल डॉ. प्रसन्न चौगुले व डॉ. किरण मराठे यांचा सत्कार करून ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.



हलकर्णी येथील सर्व दवाखाने रविवारी बंद असतात. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. रुग्णांना संकेश्वर किंवा गडहिंग्लजला जावे लागत होते. रुग्णांची ही गैरसोय लक्षात घेऊन डॉ. प्रसन्न चौगुले व डॉ. किरण मराठे यांनी दर रविवारी दवाखाना सुरू केल्याबद्दल तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष विजय शेरवी, उपसरपंच सलीम यमकनमर्डी, चंदगड विभाग जिल्हा समन्वयक सुजित पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले.



                                                                            जनतेसाठी काम करणे हे आमचे कर्तव्यच आहे अशी भावना  डॉ. चौगुले व डॉ. मराठे यांनी सत्कारानंतर व्यक्त केली. यावेळी सचिन शेरवी, अरुण शिंगाडी, राहुल शेरवी, अशोक पाटील, शकील  पट्टणकुडी, दुडांप्पा भेंडीगिरी, विजय पाटील, दिनेश मठपती, आप्पासाहेब पुजेरी, तौफिक कुदंरगी, जयपाल वड्राळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.