![]() |
| भडगाव : बेंदूर सणाच्या पूर्वसंध्येला घरोघरी मातीचे प्रतीकात्मक बैलजोडी देताना कुंभार बांधव. दुसऱ्या छायाचित्रात मोठ्या आनंदाने या बैलजोडीचे पूजन करताना चिमुकली. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): उद्या दिनांक ३ रोजी साजरा होणाऱ्या महाराष्ट्रीय बेंदूरच्या पूर्वसंध्येला घरोघरी प्रतिकात्मक मातीच्या बैलजोडींचे सकाळी आगमन झाले. यामुळे उद्या साजरा होणाऱ्या बेंदूर सणाची सर्वांना चाहूल लागली.
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे बेंदूर सण हा महत्त्वाचा मानला जातो. शेतीकामात मदत करणाऱ्या बैलांना बेंदूर सणाच्या माध्यमातून शेतकरी वर्ग कृतज्ञता व्यक्त करतो. या दिवशी या बैलांना सजविले जाते. गावातून सवाद्य मिरवणूक काढून त्यांची पूजा केली जाते. दरम्यान, बेंदूर सणाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आदल्या दिवशी सकाळी कुंभार, सुतार बांधव घरोघरी मातीचे प्रतीकात्मक बैलजोडी बनवून पूजेसाठी देतात. या मातीच्या बैलजोडींचे पूजन घरोघरी केले जाते.


