Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात बी.बी.ए.च्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात बी.बी.ए.प्रथम वर्षाच्या नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे होते.




प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक बी.बी.ए.विभाग प्रमुख प्रा.आर.डी.कमते यांनी केले. या कार्यक्रमात शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करताना शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. शिवराज महाविद्यालयाने २३ वर्षांपूर्वी व्यावसायिक अभ्यासक्रमाची गरज ओळखून बी.बी.ए.कोर्स सुरु केला. या कोर्सच्या माध्यमातून शिवराजचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. या कोर्सची व्याप्ती व्यापक आहे. व्यवहारज्ञान, व्यवस्थापन, उद्योजकता याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारा हा अभ्यासक्रम आपले करिअर घडविणारा आहे. याची जाणीव ठेऊन विद्यार्थ्यांनी बी.बी.ए. शिकले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.




यावेळी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, विना-अनुदानित विभागाचे अँकेडेमिक डायरेक्टर डॉ.आर.एस.निळपणकर, विभाग प्रमुख प्रा.आर. डी.कमते, प्रा.आझाद पटेल यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे श्री.नंदनवाडे गुरुजी, प्रा.यु.एस.पाटील, प्रा.वाय.व्ही.सोनटक्के, प्रा. श्रुती घस्ती, प्रा.सुप्रिया निकम यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.त्रिवेणी मस्ती यांनी केले तर आभार प्रा.प्राजक्ता तिनईकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.