Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी संकटाच्या छायेत; वाढदिवस साजरा करणार नाही!



मुंबई  : बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अजूनही खरीप हंगामातील पेरणीच्यादृष्टीने समाधानकारक पाऊस झाला नसल्याने बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला असताना मी माझा वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा करणे योग्य ठरणार नाही अशी जाहीर भूमिका राज्याचे नवनिर्वाचित कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. त्यांच्या या जाहीर भूमिकेचे स्वागत केले जात आहे. 



दिनांक १५ जुलै रोजी धनंजय मुंडे यांचा वाढदिवस असून तो सार्वजनिकरित्या साजरा करणार नसल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी जाहीर केले आहे.



नवनिर्वाचित कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी जनतेचे प्रेम, आशिर्वाद व शुभेच्छा सदैव माझ्यासोबत आहेत, परंतु पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाच्या भावनांची जाणीव ठेवून यावर्षी वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा न करत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत जाहीर केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.